Pranali Kodre
आयपीएल 2024 हंगामातील साखळी फेरीचे सर्व 70 सामने 19 मे रोजी संपले. त्यामुळे पाँइंट्स टेबलमधील 10 संघांची क्रमवारी निश्चित झाली आहे. आता साखळी फेरीनंतर कोणता संघ कोणत्या क्रमांकावर जाणून घेऊ.
कोलकाता नाईट रायडर्स 14 सामन्यांपैकी 9 विजय, 3 पराभव आणि 2 अर्निर्णित सामन्यांसह 20 पाँइंट्स मिळवत अव्वल क्रमांकावर राहिले.
सनरायझर्स हैदराबाद संघ 17 पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांनी 14 सामन्यांपैकी 8 विजय आणि 5 पराभव स्विकारले. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला.
राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून त्यांनी 14 सामन्यांपैकी 8 विजय मिळवले, 5 पराभव स्विकारले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे त्यांना 17 पाँइंट्स मिळाले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 पाँइंट्ससह चौथ्या क्रमांकावर राहिला. बंगळुरूने 14 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आणि 7 सामने पराभूत झाले.
चेन्नई सुपर किंग्सनेही 14 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आणि 7 सामने पराभूत झाले. त्यामुळे त्यांचेही 14 पाँइंट्स झाले, मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे ते पाचव्या क्रमांकावर राहिले.
दिल्ली कॅपिटल्सनेही 14 सामन्यांपैकी 7 विजय आणि 7 पराभवांसह 14 पाँइंट्स मिळवले, मात्र त्यांचा बंगळुरु आणि चेन्नईपेक्षा कमी नेट रन रेट असल्याने सहाव्या क्रमांकावर राहिले.
लखनौ सुपर जायंट्सनेही 14 सामन्यांपैकी 7 विजय आणि 7 पराभवांसह 14 पाँइंट्स मिळवले, पण त्यांना ७ व्या क्रमांकावर रहावे लागले.
गुजरात टायटन्स संघ आठव्या क्रमांकावर राहिला. त्यांनी 14 सामन्यांपैकी 5 विजय आणि 7 पराभव स्विकारले. तसेच २ सामने अनिर्णित राहिले, त्यामुळे त्यांना 12 पाँइंट्स मिळाले.
पंजाब किंग्स 10 पाँइंट्ससह नवव्या क्रमांकावर राहिले. पंजाबने 14 सामन्यांपैकी 5 विजय आणि 9 पराभव स्विकारले.
मुंबई इंडियन्स सर्वात शेवटच्या क्रमांकावर राहिले. त्यांनी 14 सामन्यांपैकी 4 विजय आणि 10 पराभव पत्करले.