Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाणार आहे.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात हा सामना खेळला जाणार आहे.
याचनिमित्ताने सर्च इंजिन गुगलने खास ऍनिमेटेड डूडल सादर केले आहे.
गुगल नेहमीच काही खास प्रसंग, घटना, व्यक्तीमत्त अशा अनेक गोष्टी डूडलद्वारे साजरे करत असतात.
गुगलने आयपीएल 2024 अंतिम सामन्याच्या डूडलचे वर्णन "यंदाची स्पर्धा उत्साहाने भरलेली राहिली आणि आता अनेक लोक हे पाहाण्यासाठी उत्सुक आहेत की कोणता संघ चॅम्पियन बनेल.'
दरम्यान कोलकाताने जर ट्रॉफी जिंकली, तर हे त्यांचे तिसरे विजेतेपद असेल. तसेच जर हैदराबादने ट्रॉफी जिंकली, तर त्यांचे हे दुसरे विजेतेपद असेल.
हैदराबाद आणि कोलकाता आत्तापर्यंत 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 9 सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे, तर 18 सामने कोलकाताने जिंकले आहेत.