Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला.
या लिलावात अनेक खेळाडूंना बोली लागली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य संघाकडून खेळणाऱ्या ५ खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आत्तापर्यंत महाराष्ट्राचे अनेक खेळाडू खेळले आहेत. विशेष म्हणजे चेन्नईचे नेतृत्वही महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड करतो.
आता चेन्नई संघात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठी आणि रामकृष्ण घोष यांचाही समावेश झाला आहे.
चेन्नईने राहुल त्रिपाठीला ३.४० कोटी रुपयांना आणि रामकृष्णला ३० लाखाला खरेदी केले.
चेन्नईने आयपीएल २०२५ लिलावात महाराष्ट्राच्या मुकेश कुमारलाही पुन्हा ३० लाखास संघात घेतले आहे. मुकेश यापूर्वीही चेन्नईकडून खेळले आहे.
आयपीएल २०२५ लिलावात महाराष्ट्राच्या हर्षवर्धन हंगारगेकर आणि अर्शिन कुलकर्णी या दोन खेळाडूंनाही बोली लागली. त्या दोघांना लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी ३० लाखाला संघात घेतलं आहे.