Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेआधी २४-२५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव होणार आहे.
हा मेगा लिलाव असल्याने दोन दिवस चालणार आहे. एकूण ५७४ खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
IPL 2025 मेगा लिलावात मल्लिका सागर ऑक्शनर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
गेल्यावर्षीही त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी मल्लिका या आयपीएल लिलावामध्ये ऑक्शनर म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
याआधी आयपीएलमध्ये रिचर्ड मॅडली, ह्यु एडमिड्स आणि चारु शर्मा यांनी ऑक्शनर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण २०२४ मध्ये मल्लिका यांनी ही जबाबदारी सांभाळत इतिहास घडवला.
मल्लिका यांनी वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या २०२३ आणि २०२४ या हंगामांच्या लिलावातही ऑक्शनर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
मल्लिका यांना ऑक्शनर म्हणून विविध लिलाव हाताळण्याता जवळपास दोन दशकांचा अनुभव आहे.
त्यांनी आयपीएल आणि डब्ल्युपीएल व्यतिरिक्त प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाच्या लिलावातही ऑक्शनरची भूमिका निभावली होती.