Swadesh Ghanekar
१० फ्रँचायझींनी मिळून एकूण ४६ खेळाडूंना कायम ठेवले असून,एकूण ५५८.५ कोटी रुपये त्यासाठी खर्च केले.
उर्वरित २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझींच्या पर्समध्ये ६४१.५ कोटीचं बजेट आहे.
मेगा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी ( ११६५ भारतीय आणि ४०९परदेशी) नावं नोंदवली आहेत.
यशस्वी फ्रँचायझीने जसप्रीत बुमराह (१८ कोटी), सूर्यकुमार यादव ( १६.३५ कोटी), हार्दिक पांड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), तिलक वर्मा (८ कोटी) यांना कायम ठेवले आहे.
मुंबई इंडियन्सच्या खिशात २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण करण्यासाठी ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांना १ RTM करता येणार आहे.
आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फिरकीपटू युझवेंद्र चहलसाठी मुंबई तगडी बोली लावू शकतात
अष्टपैलू खेळाडूचा फॉर्म पाहता मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला मदत म्हणून त्याला संघात घेऊ शकतात.
पंजाब किंग्सकडून खेळताना जितेशने दमदार कामगिरी केली आहे आणि तो इशान किशनची उणीव भरून काढू शकतो.
मुंबई इंडियन्स स्फोटक सलामीवीर म्हणून फिल सॉल्टचा विचार करू शकतात
KKR ने जगातील सर्वोत्तम गोलंदाजाला रिलीज केले आणि मुंबई इंडियन्ससाठी ही संधी आहे.
जसप्रीत बुमराहच्या सोबतीला तोडीसतोड गोलंदाज म्हणून मुंबई इंडियन्स मोहम्मद शमीला आपल्या ताफ्यात घेऊ शकतात.