Pranali Kodre
आयपीएल २०२५ लिलावाआधी सर्व फ्रँचायझींनी संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. याबरोबरच किती रुपये मानधन देण्यात आलंय हे देखील समोर आले आहे.
यामध्ये तीन खेळाडूंना २० कोटींहून अधिक मानधन मिळालं आहे. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक २१ कोटी रुपयात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रिटेन केले आहे.
मात्र विराट पेक्षाही अधिक रक्कम हेन्रिक क्लासनला सनरायझर्स हैदराबादने दिली आहे. त्यांनी २३ कोटी रुपयांमध्ये त्याला रिटेन केले आहे.
त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सनेने निकोलस पूरनला २१ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
याशिवाय ऋतुराज गायकवाड व रविंद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स), पॅट कमिन्स (सनरायझर्स हैदराबाद), राशिद खान (गुजरात टायटन्स), यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स), जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) या खेळाडूंना त्यांच्या संघांनी प्रत्येकी १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला आणि गुजरात टायटन्सन शुभमन गिलला प्रत्येकी १६.५० कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी १६.३५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६.३० कोटी रुपयांमध्ये रिटेन केले.