Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी (२८ सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आयपीएल २०२५ साठी प्रत्येक फ्रँचायझी ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतात, यात जास्तीत जास्त २ अनकॅप्ड खेळाडूंना कायम राहू शकतात.
त्यामुळे अंदाजे प्रत्येक फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना आयपीएल २०२५ लिलावाआधी कायम करू शकतात याचा आढावा घेऊ.
पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, रचिन रवींद्र, मथीशा पथिराना आणि महेंद्रसिंग धोनी यांना कायम करू शकतात.
पाचवेळचे विजेते मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि अंशुल कंबोज यांना कायम करू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ विराट कोहली, मोहम्मद सिराज, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन आणि यश दयाल यांना कायम करू शकतात.
राजस्थान रॉयल्स संघ संजू सॅमसन, जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांना कायम करू शकतात.
कोलकता नाईट रायडर्स संघ श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, फिल सॉल्ट, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, हर्षित राणा यांना संघात कायम करू शकतात.
गुजरात टायटन्स संघ शुभमन गिल, राशीद खान, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, मोहम्मद शमी, राहुल तेवतिया यांना संघात कायम करू शकतात.
लखनौ सुपर जायंट्स संघ के. एल. राहुल, क्विंटॉन डी कॉक, निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मार्कस स्टॉयनिस, मयांक यादव यांना कायम करू शकतात.
दिल्ली कॅपिटल्स संघ रिषभ पंत, मिचेल मार्श, हॅरी ब्रुक, जेक फ्रेसर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल यांना कायम करू शकतात.
पंजाब किंग्स संघ मॅथ्यू शॉर्ट, सॅम करन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, लियाम लिव्हींगस्टोन, आशुतोष शर्मा यांना कायम करू शकतात.
सनरायझर्स हैदराबाद संघ पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, टी. नटराजन, नितिशकुमार रेड्डी यांना कायम करू शकतात.