Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला.
या सामन्यादरम्यान कोलकाताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
25 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 64 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीत 200 षटकार पूर्ण केले.
रसेलने 200 षटकार पूर्ण करण्यासाठी केवळ 1322 चेंडूंचा सामना केला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने ख्रिस गेलच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
गेलने 1811 चेंडूत आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण केले होते. त्यामुळे रसेलने गेलपेक्षा तब्बल 489 चेंडू कमी खेळत 200 षटकार पूर्ण केले.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड असून त्याने 2055 चेंडूत 200 आयपीएल षटकार मारले आहेत.
चौथ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिविलियर्सने 2790 चेंडूत 200 आयपीएल षटकार मारले होते.
पाचव्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज फलंदाज एमएस धोनी आहे. त्याने 3126 चेंडूत 200 आयपीएल षटकार मारले आहेत.
रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर असून त्याने 200 आयपीएल षटकार 3798 चेंडूत मारले आहेत.