पाच वर्षांसाठी 2500 कोटी! टाटा समूहच राहणार IPL टायटल स्पॉन्सर

रोहित कणसे

टाटा समूह हाच पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचा टायटल स्पॉन्सर राहणार आहे.

टाटा सन्सने आयपीएल 2024 ते 2028 च्या टायटल प्रायोजकत्वासाठी दरवर्षी 500 कोटी रुपये म्हणजेच एकूण 2500 कोटी रुपयांची बोली लावली आहे.

टाटाची बोली आदित्य बिर्ला समूहाच्या बोलीशी जुळत असल्याने टाटा समूह जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा टायटल स्पॉन्सर म्हणून कायम राहणार आहे.

गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी बीसीसीआयने या प्रायोजकत्वासाठी निविदा जारी केली होती. 14 जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने यासाठी 2500 कोटी रुपयांची बोली लावली होती.

टाटा समूह गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा स्पॉन्सर असून आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटाने बीसीसीआयला 670 कोटी रुपये दिले. आता आयपीएलसाठी ही रक्कम वाढली आहे.

आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. यानंतर, बीसीसीआयने आयपीएल 2025 मध्ये ते 84 आणि नंतर आयपीएल 2026 पासून 94 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.

आयपीएलचा पुढील हंगाम 21 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असून ही स्पर्धा 26 मेपर्यंत सुरू राहू शकते. याआधी महिला प्रीमियर लीगचेही आयोजन केले जाणार आहे.

लोकसभा निवडणूक असूनही यावेळी आयपीएल भारतातच खेळवले जाण्याची शक्यता आहे.

रामलल्लाच्या मूर्तीमध्ये आहेत भगवान विष्णूंचे हे १० अवतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

statue of ramlalla
येथे क्लिक करा