IPL मध्ये खेळाडू करोडोंत खेळतात, PSL मध्ये तुलनेत चिल्लरच मिळतात

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL) टी२० क्रिकेटमधील मोठी स्पर्धा मानली जाते साल २००८ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत १७ हंगाम खेळवण्यात आले आहेत. सध्या या स्पर्धेत १० संघ खेळतात.

IPL | X/IPL

टी२० लीग

या स्पर्धेनंतर जगात अनेक क्रिकेट लीग स्पर्धा सुरू झाल्या. यामध्ये पाकिस्तान सुपर लीगचाही (PSL) समावेश आहे. २०१६ मध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेला सुरुवात झाली. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत ६ संघ खेळतात.

PSL | X/thePSLt20

आयपीएल मानधन

दरम्यान, खेळाडूंच्या मानधनाबद्दल सांगायचे झाले, तर आयपीएलमध्ये खेळाडूंचा लिलाव होतो. आयपीएल लिलावासाठी खेळाडूंनी २० लाख, ५० लाख, ७५ लाख, १ कोटी, १.५० कोटी आणि २ कोटी या श्रेणींमध्ये मुळ किंमत ठेवलेली असते. त्याचबरोबर फ्रँचायझींना ठराविक रक्कम ठरवून दिलेली असते, ज्यात त्यांना त्यांचा संघ पूर्ण करायचा असतो.

IPL | X/IPL

आयपीएल लिलाव

दरम्यान, आयपीएल लिलाव होत असल्याने खेळाडूंना फ्रँचायझी लावतील तेवढी मोठी रक्कम मिळते. जरी एखाद्या खेळाडूची मुळ किंमत २० लाख असेल, तरी त्याला कोट्यवधी रुपये मिळू शकतात. आयपीएल २०२४ लिलावात मिचेल स्टार्कला सर्वोच्च 24.75

IPL | X/IPL

पाकिस्तान सुपर लीग

पाकिस्तान सुपर लीगबद्दल सांगायचे झाले, तर खेळाडूंना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले जाते, जसे प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर, एमर्जिंग आणि सप्लिमेंटरी.

PSL | X/thePSLt20

पीएसएल मानधन

या वेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे मानधन असते. जसे की प्लॅटिनमसाठी 130,000 डॉलर ते 170,000 डॉलर, डायमंडसाठी 60,000 डॉलर ते 80,000 डॉलर, गोल्डसाठी 40,000 डॉलर ते 50,000 डॉलर, सिल्व्हरसाठी 15,000 डॉलर ते 25,000 डॉलर, एमर्जिंगसाठी 7,500 डॉलर, तर सप्लिमेंटरीसाठी 50,000 डॉलर मानधन मिळते.

PSL | X/thePSLt20

खेळाडूंचे मानधन

म्हणजेच साधारण जास्तीत जास्त १.४२ कोटी ते कमीत कमी ६.२९ लाख रुपयांपर्यंत मानधन पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंना मिळते.

PSL | X/thePSLt20

Pro Kabaddi 11: लिलावातील सर्वात महागडे ५ खेळाडू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 11 Auction 5 expensive Players | Sakal
येथे क्लिक करा