सकाळ डिजिटल टीम
२४ व २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल लिलावाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत आहे.
आयपीएल विजेत्या फ्रॅंचायझींनी त्यांच्या कर्णधारांना कधी खरेदी केकेले हे जाणू घेऊयात.
राजस्थान रॉयल्स संघासाठी आयपीएल जिंकलेल्या खेळाडू शेन वॉर्नला राजस्थान संघाने २००८ मध्ये खेरेदी केले होते.
डेक्कन चार्जर्स संघासाठी २००९ साली आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या एडम गिलख्रिस्टला डेक्कन चार्जर्स फ्रॅंचायझीने २००८ साली करारबद्ध केले होते.
चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी ५ आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या कर्णधार एम एस धोनीला आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ साली सिएकेने करराबद्ध केले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी ५ आयपीएल विजेतेपदे पटकावणारा कर्णधार रोहित शर्मा २०११ साली मुंबई संघामध्ये सामील झाला.
२०११ साली कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधार गौतम गंभीरला केकेआरने २०११ साली संघातस करारबद्ध केले होते.
सनरायझर्स हैद्राबादसाठी २०१६ साली आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला २०१४ साली सनरायझर्स हैद्राबाद संघाने खरेदी केले होते.
२०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या श्रेयस अय्यरला २०२२ साली केकेआर संघात सामील केले होते.