Saisimran Ghashi
आजच्या काळात केस गळणे आणि टक्कल पडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे
यावर उपाय म्हणून सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स वेबसाईटवर आदिवासी तेल खूप चर्चेत आहे.
पण हे तेल खरोखरच केस वाढवते का याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यानुसार हे तेल आदिवासी समाजातील एक प्राचीन औषधी आहे.
यातील 13 औषधी वनस्पतींचे मिश्रण असल्याचा दावा केला जातो.
हे तेल केस गळणे थांबवते आणि नवीन केस वाढवते असे सांगितले जाते.
या तेलाची बनावट कॉपी असलेले तेल सोशल मीडिया आणि अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर कमी दरात विकले जाते.
हे तेल प्राचीन काळापासून वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतीच्या मिश्रणातून बनवले जाते जे मेंदूला थंडावा देऊन केसांच्या मुळांना पोषण देते.
या तेलाच्या प्रभावीपणावर वैज्ञानिक दृष्ट्या आधारित कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
कोणतेही तेल वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही याचे समर्थन करत नाही.