बिग बॉस मराठी फेम अंकिता 'या' कलाकाराबरोबर बांधणार लग्नगाठ ?

kimaya narayan

अंकिता वालावलकर

बिग बॉस मराठी सीजन 5 मधून घराघरात पोहोचलेल्या अंकिता वालावलकरने कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली.

बिग बॉस मधील वावर

घरातील तिचा गेम आणि तिचा वावर अनेकांना आवडला. बऱ्याच जणांना अंकिता विनर व्हावी असं वाटत होतं.

स्पर्धकांबरोबरील बॉण्ड

सूरज, पॅडी, अभिजीत आणि धनंजय यांच्याबरोबरच तिचं बॉण्डिंगही चर्चेत राहील.

लग्नाची चर्चा

पण अंकिता सगळ्यांना आवडली ते तिच्या लवकरच होणाऱ्या लग्नामुळे. बिग बॉस मराठीमध्ये गेल्यानंतर अंकिताने तिचं लग्न होणार असल्याचं जाहीर केलं आणि होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं तिने उघड केलं.

हा आहे अंकिताचा बॉयफ्रेंड ?

त्यामुळे अंकिताचा नवरा कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यातच अंकिताचा एक फोटो समोर आलाय. ज्यात ती एका तरुणाबरोबर दिसतेय.

संगीत दिग्दर्शक

तिच्या बरोबर दिसणारी ही व्यक्ती आहे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगत. कुणाल मराठी इंडस्ट्रीमध्ये संगीतकार आहे.

डेटिंगची चर्चा

त्याने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. अंकिताने बिग बॉस मध्ये दिलेल्या हिंटमुळे कुणालच अंकिताचा होणारा नवरा असावा असा अनेकांचा अंदाज आहे.

शेरनी आर्याचं शिक्षण किती ? - येथे क्लिक करा