Saisimran Ghashi
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असून ती शरीराला ताजेतवाने आणि मनाला शांत ठेवते.
दुपारी 10 ते 30 मिनिटांच्या झोपेला 'पॉवर नॅप' म्हणतात, जी थकवा घालवण्यासाठी उपयुक्त ठरते.
दुपारची झोप शरीराला नवीन ऊर्जा देते आणि दिवसभरात झालेला थकवा दूर करते.
दुपारची झोप मेंदूला ताजेतवाने करून स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.
दुपारी काही वेळ झोपल्याने काम करण्याची गती आणि एकाग्रता वाढते.
दुपारी 10 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त झोपल्यास सुस्ती येऊ शकते, त्यामुळे मर्यादित झोपेचा सल्ला दिला जातो.
प्रत्येकाच्या शरीरघडणी आणि वेळेनुसार दुपारची झोप फायदेशीर ठरते; काहींना यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.