सकाळ डिजिटल टीम
स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला कौमार्य पडदा म्हणजे हायमेन. शरीर संबंधांच्या वेळी पडदा फाटतो आणि त्यावेळी कौमार्य किंवा व्हर्जिनिटी भंग होते, असं मानलं जातं.
पण खरंतर विज्ञानामध्ये या संकल्पनेला जागा नाही. अनेक स्त्रियांना जन्मजात पडदा नसतो.
काही स्त्रिया खेळताना, पळताना, सायकल चालवताना हा पडदा फाटतो.
काहींचा पडदा एवढा लवचिक असतो की, शारिरीक संबंध करूनही तो फाटत नाही. त्यामुळे यावरुन ती कुमारी म्हणजे व्हर्जिन आहे की नाही हे ठरवणं अयोग्य आहे.
लग्नाआधी व्हर्जिनिटी गमावणं, म्हणजे शरीरसंबंध ठेवणं योग्य की अयोग्य याचं ठाम उत्तर देता येणार नाही.
बळजबरी करून कोणी संबंध ठेवत असेल तर ते गैर आहे. परस्पर संमतीने संबंध ठेवले तर त्यात अयोग्य काही नाही.
मात्र शारिरीक संबंधातून एखादा एचआयव्हीसारखा आजार झाला, गर्भधारणा राहिली, तर अशा संबंधांची तुम्ही जबाबदारी घेऊ शकाल का? त्यासाठी कायदेशीरदृष्ट्या सज्ञान आहात का?
शारीरिक संबंधातून निर्माण होणाऱ्या परिणामांची तुम्हाला कल्पना आहे आणि जबाबदारी घेण्यास तुम्ही सक्षम असाल, तर लग्नाच्या आधीही संबंध ठेवण्यास हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.