कार्तिक पुजारी
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते, त्याच बरोबर त्वचेसाठी देखील चांगले असते
ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये लिंबूच्या रसाचा वापर केला जातो
अनेकजण लिंबूचा रस त्वचेला लावतात, असं करणं योग्य असतं का? जाणून घेऊया
तज्त्र सांगतात की, लिंबूचा रस थेट चेहऱ्यावर लावल्याने जळजळ आणि चेहऱ्यावर रॅशेस येऊ शकतात
चेहऱ्यावर पिंपल्स असले तरी चेहऱ्यावर निंबू थेट लावू नये. कारण, लिंबूचा रस हा अॅसिडिक असतो
लिंबूचा रस थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा कोरडी पडू शकते
लिंबूचा रस ब्राईट-ग्लोईंग स्किनसाठी चांगले असते. घरगुती फेस पॅकमध्ये तुम्ही चार ते पाच थेंब लिंबूचा रस टाकून ते चेहऱ्यावर लावू शकता