Sudesh
जगप्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाच्या शोधासाठी न्यूटन ओळखले जातात.
4 जानेवारी 1643 रोजी न्यूटनचा जन्म झाला होता. गुरुत्वाकर्षण सोबतच अन्य कित्येक वैज्ञानिक शोध न्यूटनने लावले.
आयझॅक न्यूटन हे लहानपणापासूनच अगदी संवेदनशील होते. त्यामुळे त्यांना जराही टीका किंवा निंदा सहन होत नव्हती.
1671 साली न्यूटन यांनी रॉयल सोसायटीसमोर एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. मात्र, यावर सोसायटी सदस्य रॉबर्ट हुक यांनी टीका केली.
या टीकेमुळे व्यथित होऊन न्यूटन यांनी स्वतःचा जगापासून संपर्क तोडला. याचवेळी ते धार्मिक जादूटोण्याच्या पुस्तकांकडे ओढले गेले.
न्यूटन हे या सगळ्यात एवढे गुरफटले की, त्यांनी चक्क लोखंडाचं सोनं करणाऱ्या परीसाचा शोध सुरू केला.
त्यांनी रोमन कॅलेंडर आणि कित्येक धर्मांचा अभ्यास करून अशी भविष्यवाणी केली, की हे जग 2060 साली नष्ट होणार आहे.
अखेर एडमंड हॅले या वैज्ञानिकाने न्यूटनला या सगळ्यातून बाहेर आणलं. त्यांनी न्यूटनमधील वैज्ञानिक पुन्हा जागा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.