Ishan Kishan साठी टीम इंडियात परतीचा 'आखरी रास्ता'!

Swadesh Ghanekar

रोहित शर्माकडे वन डे संघाचे नेतृत्व..

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची इच्छा पूर्ण केली आणि वन डे मालिकेत खेळण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रोहितकडे वन डे संघाचे नेतृत्व कायम राहिले आहे. शुभमन गिल हा संघाचा उप कर्णधार असणार आहे.

ishan kishan comeback in team india | sakal

ऋषभ पंत, संजू सॅमसनला पसंती

ऋषभ पंतने वन डे व ट्वेंटी-२० संघातील स्थान कायम राखले आहे. वन डेमध्ये लोकेश राहुल आणि ट्वेंटी-२०त संजू सॅमसन हे पर्यात बीसीसीआयने निवडले आहेत. इशान किशन या दोन्ही संघाच्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ishan kishan comeback in team india | sakal

हर्षित राणा, रियान पराग यांना वन डेत संधी

हर्षित राणा व रियान पराग यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे. ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा यांना ट्वेंटी-२० संघात स्थान मिळालेले नाही. रियान, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन, शिवम दुबे, खलिल अहमद, ऋषभ, अर्शदीप सिंग यांचा वन डे व ट्वेंटी-२० संघातही समावेश आहे.

ishan kishan comeback in team india | sakal

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार अन्...

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मानसिक थकवा आल्याचं कारण सांगून संघातून सुट्टी मागणाऱ्या इशान किशनकडे बीसीसीआयने काणाडोळा करण्याचे ठरवलेले दिसतेय. इशानला त्यानंतर भारतीय संघात निवडलेच गेले नाही. त्यात ऋषभच्या पुनरागमनामुळे इशानचा मार्ग अडचणीचा झाला आहे.

ishan kishan comeback in team india | sakal

वार्षिक करातून हकालपट्टी...

आफ्रिका मालिकेतून माघारी परतल्यानंतर इशानला देशांर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते. पण, इशानने त्याकडे दुर्लक्ष केले. श्रेयस अय्यरही असाच वागला होता. त्यामुळेच बीसीसीआयने या दोघांना वार्षिक करारातून हटवले. त्यानंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेत काही सामने खेळला, परंतु इशान गायबच राहिला.

ishan kishan comeback in team india | sakal

KKRचे जेतेपद अन् श्रेयसची वापसी...

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही श्रेयसला संघाबाहेर ठेवले गेले होते. बीसीसीआयच्या सूचनेकडे केलेलं दुर्लक्ष त्याला महागात पडले होते. पण, आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली KKR ने जेतेपद पटकावले आणि गौतम गंभीर हेड कोच झाल्याने त्याची वापसी झाली.

ishan kishan comeback in team india | sakal

इशान किशनकडे परतीची एकच वाट...

इशान किशनला भारतीय संघात परतायचे असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल. फक्त आयपीएल खेळत राहिल्यास त्याच्या कारकीर्दिला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. टीम इंडियात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ, संजू सॅमसन आणि लोकेश राहुल हे अनुभवी खेळाडू आहेतच.

ishan kishan comeback in team india | sakal

इशान किशनची कारकीर्द...

इशान किशनने भारताकडून दोन कसोटी सामन्यांत ७८ धावा केल्या आहेत. २७ वन डे व ३२ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे ९३३ व ७९६ धावा आहेत. वन डेत द्विशतक झळकावणाऱ्या तरुण खेळाडूचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

ishan kishan comeback in team india | sakal

माहेरी गेलेल्या नताशा स्टॅनकोविकची प्रॉपर्टी किती?

natasha stankovic property | sakal
येथे क्लिक करा