इस्रो करणार कृष्णविवरांचा अभ्यास; काय आहे नवी मोहीम?

Sudesh

इस्रो

2023 साली कित्येक मोहिमा यशस्वीपणे पार पाडून इस्रोने जगाला आपली दखल घ्यायला लावली.

ISRO New Mission | eSakal

नवी मोहीम

यानंतर 2024 साली नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो आपली नवी मोहीम लाँच करणार आहे.

ISRO New Mission | eSakal

ब्लॅक होल्स

ब्लॅक होल्स, म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसॅट (XPoSat) मिशन लाँच करणार आहे.

ISRO New Mission | eSakal

पीएसएलव्ही

एक जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी हे लाँच होईल. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह पीएसएलव्ही रॉकेटचा वापर करण्यात येईल.

ISRO New Mission | eSakal

उद्दिष्ट

एक्सपोसॅट मोहीमेचा उद्दिष्ट विश्वातील सर्वाधिक चमकदार अशा 50 प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करणे आहे.

ISRO New Mission | eSakal

कालावधी

एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या खालच्या वर्तुळाकार कक्षेत स्थिरावण्यात येईल. तो 500 ते 700 किलोमीटर त्र्यिज्येत पृथ्वीभोवती फिरेल. कमीत कमी पाच वर्षे तो अंतराळाचा अभ्यास करेल.

ISRO New Mission | eSakal

पेलोड

यामध्ये POLIX आणि XSPECT ही दोन उपकरणे पाठवण्यात येतील. ही उपकरणे रामन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यूआर राव सॅटेलाईट सेंटरने मिळून तयार केली आहेत.

ISRO New Mission | eSakal

फायदा

या मोहिमेमुळे केवळ कृष्णविवरेच नाही, तर इतर सौरमाला आणि त्यातील ग्रहांबाबत देखील महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.

ISRO New Mission | eSakal

दुसरीच मोहीम

एक्सपोसॅट ही जगातील दुसरीच अशी मोहीम आहे. यापूर्वी नासाने 2021 साली इमेजिंग एक्स-रे पोलारिमेट्री एक्सप्लोरर लाँच केलं होतं.

ISRO New Mission | eSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Death Prediction | eSakal
येथे क्लिक करा