Sudesh
भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो ही सध्या एकापाठोपाठ एक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं की इस्रो आता नव्या सॅटेलाईट प्रोजेक्टवर काम करत आहे.
इस्रो येत्या पाच वर्षांमध्ये अवकाशात 50 उपग्रह लाँच करणार आहे. हे सर्व उपग्रह देशाच्या सुरक्षेसाठी काम करतील.
हे सर्व उपग्रह भारताच्या सीमा क्षेत्रासह चीन-पाकिस्तान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर लक्ष ठेवतील.
अवकाशातील विविध कक्षांमध्ये हे उपग्रह तैनात करण्यात येतील, असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
भारताला एक मजबूत राष्ट्र बनवायचं असेल तर त्यासाठी सध्या उपलब्ध सॅटेलाईट्सचा ताफा पुरेसा नसल्याचं सोमनाथ म्हणाले.
आजच्या तुलनेत आपल्याकडे दहा पट मोठ्या आकाराच्या ताफ्याची गरज आहे. त्यामुळे इस्रो हे उपग्रह लाँच करणार आहे.
यासाठी उपग्रह असेंबल करण्यात आले आहेत. जे येत्या काही वर्षांमध्ये भारतात येतील, आणि प्रक्षेपित केले जातील असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.