Anuradha Vipat
सुकेश चंद्रशेखरने केलेल्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती
गेल्या काही काळापासून सुकेश तुरुंगातून जॅकलिनला सतत पत्र लिहून त्रास देत असल्याचा दावा तिने केला आहे.
आता याप्रकरणी जॅकलिनने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे सुकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रिपोर्टनुसार जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून याबद्दल तक्रार दाखल केली होती
जॅकलिनने दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली आहे
जॅकलिन फर्नांडिस सध्या या प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. आता सुकेश तिला तुरुंगातून धमकी देखील देत असल्याचे जॅकलिन फर्नांडिसने म्हटले आहे.