Jagannath Temple : खरंच इथे आजही श्रीकृष्णांचं हृदय जीवंत आहे का?

साक्षी राऊत

जगन्नाथ रथ यात्रा

दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात द्वितिया तिथीला जगन्नाथ रथ यात्रा निघते. दरवर्षी लाखो लोक येथे एकत्रित येतात. यंदा १४६ वी रथयात्रा निघणार आहे.

Jagannath Temple

दरवर्षी जगन्नाथ मावशीच्या घरी जातात

या यात्रेत भगवान जगन्नाथ आपली बहिण सुभद्रा आणि भाऊ बलभद्रसोबत ३ सुंदर रथांमध्ये बसून गुंडिचा मंदिरात पोहोचतात. गुंडिचा मंदिरात ते ७ दिवस विश्रांती करतात.

Jagannath Temple

रथ यात्रा काढण्याचे कारण

भगवान जगन्नाथांच्या बहिणीने एक दिवस नगर फिरण्याचा हट्ट केला. तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र त्यांच्या लाडक्या बहिणीला रथातून नगर दाखवण्यास निघाले. यादरम्यान ते मावशीच्या घरी गेले आणि ७ दिवस थांबले.

Jagannath Temple

तुम्हाला या रहस्याबाबत माहितीये?

या मंदिरात भगवान जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या मुर्त्या आहेत. लाकडांच्या मुर्त्या असलेलं हे देशातील अनोखं मंदिर आहे. या मंदिरात काही रहस्यही दडलेले आहेत.

Jagannath Temple

ही गोष्ट अजून नाही बदललेली

जगन्नाथ मंदिरातील या तीन मुर्त्या दर १२ वर्षांनी बदलतात. मात्र एक गोष्ट अजिबात बदलत नाही ते म्हणजे ब्रम्ह पदार्थ. या दरम्यान ब्रम्ह पदार्थ जुन्या मुर्तीवरून काढून नव्या मुर्तीला लावण्यात येतो.

Jagannath Temple

काय आहे ब्रम्ह पदार्थ?

ब्रम्ह पदार्थाला भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाला जोडून बघितले जाते. येथील पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे जेव्हा ब्रम्ह पदार्थाला जुन्या मुर्तीतून नव्या मु्र्तीत जोडलं जातं तेव्हा त्यांना हृदयस्पर्श जाणवतो.

Jagannath Temple

सिंहद्वार काय असतं?

मंदिरात एक सिंह द्वार आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही सिंह द्वारातून बाहेर पडता तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज वाढतो. मात्र सिंहद्वारात प्रवेश करताच आवाज बंद होतो.

Jagannath Temple

मंदिरातील झेंड्याचे रहस्य

जगन्नाथ मंदिर चार लाख फूट स्क्वेअर मीटर परिसरात आहे. ज्याची उंची २१४ फूट आहे. एका मंदिराच्या शिखरावर एक झेंडा लागलेला आहे जो कायम हवेच्या विरूद्ध दिशेने उडतो.

Jagannath Temple

मंदिराची सावली

या मंदिराचं विशेष रहस्य म्हणजे या ठिकाणी कितीही ऊन पडली तरी मंदिराची सावली कधीच पडत नाही.

Jagannath Temple

खाण्याची टंचाई कधीच भासली नाही

जगन्नाथ मंदिरात जगातील सगळ्यात मोठं स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाकघरात ८०० लोक काम करतात. या स्वयंपाकघराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे किती जनसमुदाय आला तरी जेवण कमी पडत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Temple