नवरीची १७ कोटींची साडी आणि ३० लाखांचा मेकअप

Monika Lonkar –Kumbhar

५०० कोटींचे शाही लग्न

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात तब्बल ५०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचा विवाह ६ नोव्हेंबर २०१६ मध्ये पार पडला होता. 

महागडे लग्न

५ दिवस चाललेल्या या लग्नात तब्बल ५०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. हा विवाह केवळ कर्नाटक राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झाला होता.

राजीव रेड्डीसोबत बांधली लग्नगाठ

हैदराबाद येथील व्यवसायिक राजीव रेड्डीसोबत ब्राह्मणी रेड्डीने लग्न केले.

१७ कोटींची साडी

ब्राह्मणी हिने लग्नात तब्बल १७ कोटी रूपयांची महागडी साडी नेसली होती. ही साडी कांजीवरम होती. विशेष म्हणजे सोन्याची तार असलेली ही भरजरी साडी होती.

९० कोटींचे दागिने

साडीसोबतच तिने परिधान केलेल्या हिऱ्याच्या दागिन्यांची किंमत ही ९० कोटी रूपये होती

३० लाखांचा मेकअप

ब्राह्मणीच्या मेकअपची देखील तितकीच चर्चा झाली. कारण, तिच्या लग्नात करण्यात आलेला मेकअप हा तब्बल ३० लाख रूपयांचा होता.

५० हून अधिक मेकअप आर्टिस्ट

ब्राह्मणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला खास मुंबईहून बोलावण्यात आले होते. तिची फी तबब्ल ६ लाख रूपये आकारण्यात आली होती. वधू व्यतिरिक्त तिच्या पाहुण्यांचा मेकअप करण्यासाठी बंगळूरच्या ५० हून अधिक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टना बोलावण्यात आले होते. ज्यावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.