सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री जान्हवी कपूर कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. तिचे लेटेस्ट फोटो सगळ्यांनाच पसंत पडतात.
सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो व्हायरल होतोय.
जान्हवीने नुकत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया बरोबर तिरुपतीचं दर्शन घेतलं. याचं कारणही खास होतं. आज जान्हवीची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा वाढदिवस आहे.
यानिमित्त जान्हवी आणि शिखर तिरुपतीला गेले होते आणि तिथे त्यांनी पूजाही केली.
दरवर्षी शिखर आणि जान्हवी श्रीदेवी यांच्या वाढदिवसाला तिरुपतीला जाऊन देवाचे आशीर्वाद घेतात.
गेला बराच काळ जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत.
जान्हवीने सोशल मीडियावर श्रीदेवी यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. "हॅपी बर्थडे आई, आय लव्ह यु" अशी पोस्ट जान्हवीने आईसाठी लिहिली.