Anuradha Vipat
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आईच्या दाक्षिणात्य प्रथा, परंपरा यांच्यावर फार विश्वास ठेवते
वाढदिवसानिमित्त जान्हवी तिरुपतीला दर्शन घेण्यासाठी गेली होती आणि मंदिरात जाताना गुडघे टेकत ती पायऱ्या चढली.
याचा व्हिडीओ ओरीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.जान्हवी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ओरी आणि शिखरबरोबर तिरुमालाला पोहोचली.
या दिवशी तिने पिच रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ओरीच्या व्हिडीओमध्ये जेव्हा त्याने जान्हवीला विचारलं की, तुला आज कसं वाटतय?
यावर जान्हवी म्हणाली, “देवाला भेटण्याचा हक्क कमावणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही ते कमवण्याचा प्रयत्न करत आहोत
जान्हवी येत्या काळात ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’, ‘देवरा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे