Anuradha Vipat
अभिनेत्री जान्हवी कपूर काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच जान्हवी आजारी पडल्याची माहिती समोर आली होती.
त्यावेळी तिच्या आजारपणात तिची काळजी कोणी घेतली यावर जान्हवीने वक्तव्य केले आहे.
जान्हवी म्हणाली की, मला फूड पॉयजनिंग झाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
पुढे जान्हवी म्हणाली की, त्यावेळी शिखरच्या आईने माझी माझ्या आईसारखी काळजी घेतली.
जान्हवीला दवाखान्यात दाखल केल्यानंतर शिखरची आई स्मृती शिंदे या रात्रभर जान्हवीजवळ होत्या
जान्हवी लवकरच तिच्या उलझ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.