जान्हवी कपूरने केली पापाराझी कल्चरविषयी पोलखोल

Anuradha Vipat

‘मोडस ऑपेरेंडी’

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने पापाराझींची ‘मोडस ऑपेरेंडी’ सांगितली आहे.

सेलिब्रिटींची किंमत

ते कशाप्रकारे काम करतात आणि सेलिब्रिटींची किंमत कशी ठरवली जाते, याविषयी तिने पोलखोल केली आहे.

पापाराझी कल्चरविषयी

नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला पापाराझी कल्चरविषयी प्रश्न विचारण्यात आला.

कॅमेरासमोर

त्यावर ती म्हणाली, माझे फोटो क्लिक करण्यासाठी त्यांना एअरपोर्टवर बोलावलं जातं. पण जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसतं किंवा मी शूटिंगला जात नसते, मला कॅमेरासमोर यायचं नसतं, तेव्हा त्यांना थोडी अधिक मेहनत घ्यायची असेल तर कारचाही पाठलाग करतात.

पैसे

त्यांना प्रत्येक फोटोसाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते कारचा पाठलाग करून येतात. प्रत्येक सेलिब्रिटीचा एक रेशन कार्ड असतो. त्यांचे फोटो विकले तर त्यांना खूप पैसे मिळतात असंही यावेळी जान्हवी म्हणाली

किंमत

जर तुमची किंमत अधिक असेल तर ते स्वत: तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमच्या गाडीचा पाठलाग करतात. जर तुमच्या फोटोंना तेवढी किंमत नसेल, तर तुम्हाला पापाराझींना बोलवावं लागतं.असंही यावेळी जान्हवी म्हणाली

प्रमोशन

जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी दिलीप जोशी घेतात एवढं मानधन

येथे क्लिक करा