Anuradha Vipat
जान्हवी कपूर ही लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी जान्हवीने अमेरिकेत जाऊन अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं.
पण हे सगळं प्रशिक्षण निरर्थक होतं असा खुलासा नुकताच जान्हवीने केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेत जाण्यापेक्षा भारतात राहून इथल्या लोकांबद्दल, संस्कृतीबद्दल, भाषांबद्दल जाणून घ्यायला हवं होतं असं वक्तव्य जान्हवीने केलं आहे.
मराठी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेक ‘धडक’मधून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे
अमेरिकेत घेतलेले प्रशिक्षण तिथल्या फिल्म इंडस्ट्रीला समोर ठेवून देण्यात आले होते, त्याचा फायदा भारतात येऊन काम करण्यात अजिबात झाला नाही असं जान्हवीने स्पष्टपणे सांगितलं