काय सांगता! 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू

सकाळ डिजिटल टीम

ऋतू म्हटलं की, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असं उत्तर दिलं जातं.

आश्चर्याची बाब म्हणजे याव्यतिरिक्त इतरही असे काही ऋतू आहेत जे इतर देशांमध्ये बरेच बदल घडवून आणताना दिसतात.

चीनच्या कॅलेंडरमध्ये 4 किंवा 6 नव्हे तर 24 ऋतू आहेत.

तर, जपानमध्ये एक दोन नव्हे, तब्बल 72 ऋतू असतात.

'को' असं या जपानी संकल्पनेचं नाव. हा ऋतू दर पाच दिवसांनी बदलतो.

जपानमधील या ऋतूंना रिशुन, उसुई, रिक्का, शोमोन, सोको, रिट्टो, शोशेत्सु, ताईसेत्सु अशी नावं आहेत.

1685 मध्ये खगोलशास्त्रज्ञ शिबुकावा शुनकाई यांनी जपानचे छोटे ऋतू तयार केले.