आशुतोष मसगौंडे
आशिया खंडातील महत्त्वाचा देश असलेला जपान गेल्या काही दिवसांपासून घटत्या जन्मदाराशी झुंजत आहे.
घटलेल्या जन्मदरामुळे जपानमध्ये वृद्धांची संख्या वाढली आहे. मात्र दुसरीकडे जपानचे तरुण पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा गाजवत आहेत.
फ्रान्सच्या पॅरिसमध्ये 26 जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली आहे. यात जपान दमदार कामगिरी करत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या 5व्या दिवसापर्यंत जपानने सर्वाधिक 7 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
ही कामगिरी करताना जपानने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या दिग्गज देशांनाही मागे टाकले आहे.
जपानने जिंकलेल्या सुवर्ण पदकांमध्ये जुडोच्या 3, स्केटबोर्डिंगच्या 2, फेंसिंगच्या आणि जिमनॅस्टीकच्या प्रत्येक एक सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
या सात सुवर्ण पदकांसह जपानने दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत.