New Law : सहमतीने संबंधाचं वय १६ वर्षे, नवीन कायदा पारित

Sudesh

जपान

जपानने आपल्या कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल केला आहे. यामध्ये जपान सरकारने बलात्काराच्या व्याख्येमध्ये बदल केला आहे, तसंच सहमतीने संबंधाच्या वयात देखील वाढ केली आहे.

Japan New Law | eSakal

सहमतीने संबंध

यापूर्वी जपानमध्ये सहमतीने संबंधांचं वय १३ वर्षे होतं, तर आता ते वाढवून १६ वर्षे करण्यात आलं आहे.

Japan New Law | eSakal

बदलाची गरज

जपानमधील बलात्कारासंबंधी कायद्यांमध्ये गेल्या शतकापासून कोणताही मोठा बदल करण्यात आला नव्हता. तसंच, जपानमधील सहमतीने संबंध ठेवण्याचं वय हे जगात सर्वात कमी होतं.

Japan New Law | eSakal

शतकातील मोठा बदल

१९०७ नंतर पहिल्यांदाच हे वय बदलण्यात आलं आह. त्यामुळे हा बदल ऐतिहासिक मानला जातोय.

Japan New Law | eSakal

व्याख्येत काय बदल?

जपानमध्ये यापूर्वीची बलात्काराची व्याख्या 'हल्ला' करून, किंवा 'बेशुद्धावस्थेत' प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध अशी होती. मात्र आता ती बदलून 'असहमतीने' प्रस्थापित केलेले शारीरिक संबंध अशी करण्यात आली आहे.

Japan New Law | eSakal

अनेक वर्षांचा लढा

गेल्या कित्येक वर्षांपासून बलात्काराच्या कमकुवत व्याख्येमुळे अनेक दोषी कायद्याच्या कचाट्यातून सुटले होते. यामुळे जपानमधील जनतेत रोष होता.

Japan New Law | eSakal

२०१९ नंतर आंदोलन चिघळले

२०१९ मध्ये जपानच्या जनतेने याबाबत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. यानंतर एप्रिल २०१९ नंतर प्रत्येक महिन्याच्या ११व्या दिवशी संपूर्ण जपानमधील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन न्याय मागत होते.

Japan New Law | eSakal

आणखी काही बदल

बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठीची मुदत ही यापूर्वी १० वर्षे होती, मात्र आता ती १५ वर्षे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan New Law | eSakal