बुमराह @400! आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जस्सीने गाठला मोठा टप्पा

Pranali Kodre

भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून सुरू आहे.

Team India | Sakal

भारताकडे आघाडी

या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी बांगलादेश संघाचा पहिला डाव ४७.१ षटकात १४९ धावांवर संपला. त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली आहे.

Team India | Sakal

बुमराहच्या ४ विकेट्स

भारताकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेतल्या.

Team India | Jasprit Bumrah | Rohit Sharma | Sakal

४०० वी विकेट

त्याने तिसरी विकेट हसन मेहमुदलाही ९ धावांवर बाद करत घेतली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० वी विकेट पूर्ण केली.

Team India | Sakal

१० वा खेळाडू

जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्स पूर्ण करणारा १० वा भारतीय खेळाडू ठरला.

Jasprit Bumrah | Sakal

४०० विकेट्स घेणारे भारतीय

बुमराहपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे (९५६), आर अश्विन (७४४), हरभजन सिंग (७११), कपिल देव (६८७), झहीर खान (६१०), रविंद्र जडेजा (५७०), जवागल श्रीनाथ (५५१), मोहम्मद शमी (४४८) आणि इशांत शर्मा (४३४) या भारतीय खेळाडूंनी ४०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

Jasprit Bumrah | Sakal

६० वा गोलंदाज

बुमराह ४०० विकेट्स पूर्ण करणारा जगातील ६० वा गोलंदाज ठरला आहे.

Jasprit Bumrah | Sakal

R Ashwin साठी चेपॉक ठरलं विक्रमी! 'हा' पराक्रम करणारा पाचवाच ऑलराऊंडर

R Ashwin | X/BCCI
येथे क्लिक करा