Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघही सज्ज आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर आहे.
दरम्यान, टी20मध्ये बऱ्याचदा वेगवान गोलंदाजांवर डेथ ओव्हर्समध्ये म्हणजेत 16 ते 20 ओव्हरमध्ये मोठी जबाबदारी असते.
त्यामुळे आता आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी 2022 पासून डेथ ओव्हरमध्ये बुमराह, सिराज आणि अर्शदीप यांची टी20 क्रिकेटमधील कामगिरी कशी राहिली आहे, जाणून घेऊ.
2022 पासून बुमराहने 44.1 डेथ ओव्हर्स टाकताना 319 धावा खर्च केल्या, तर 29 विकेट्स घेतल्या. त्याची 15.9 सरासरी आहे, तर 7.2 इकॉनॉमी रेट आहे.
सिराजने 2022 पासून 47 डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना 24.7 सरासरी आणि 10 च्या इकोनॉमी रेटने 470 धावा खर्च करत 19 विकेट्स घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंगने 2022 पासून टी20 मध्ये तब्बल 126 डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली, यामध्ये त्याने 1235 धावा खर्च करताना 64 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची सरासरी 19.3 होती आणि 9.8 चा इकोनॉमी रेट होता.