रोहित कणसे
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने शानदार गोलंदाजी केली, ज्यात त्याच्या दमदार यॉर्करचा समावेश होता.
बुमराहचा तो यॉर्कर इतका घातक होता की इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपचा मिडल आणि लेग स्टंप हवेत उडताना पाहायला मिळाला.
बुमराहचा हा यॉर्कर पाहून चाहते वेडे झाले आहेत सोशल मीडियावर अख्का दिवसभर त्याच्या या बॉलची चर्चा होत होती.
हा चेंडू पाहून कोणाची आठवण येते असा प्रश्न पाकचा वेगवान गोलंदाज वकार युनूसला विचारला असता 'मला कोणाचीच आठवण येत नाही, ही बुमराहची जादू आहे' असं उत्तर त्याने दिलं.
बुमराहने देखील या यॉर्कर बद्दल आपलं मत दिलं तो म्हणाला की, पहिला चेंडू टाकायला मी शिकलो तो यॉर्कर होता- वकार, वसीम आणि झहीर खान सारख्या खेळातील दिग्गजांना पाहात आलो आहे.
अँडरसनबरोबरच्या तुलनेबद्दल बोलताना, कोणत्याही गोलंदाजाशी स्पर्धा नाही, कारण मी लहानपणी फक्त वेगवान गोलंदाज पाहायचो, त्यामुळे मला आनंद मिळतो, त्यामुळे जर वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत असेल तर त्यांचे अभिनंदन असं बुमराने म्हणाला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने कसोटीत 9 विकेट घेतल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
जसप्रीत बुमराह त्याच्या वेगवान आणि अचूक यॉर्कर्सने जगभरातील फलंदाजांसाठी एक भीतीचे कारण बनला आहे.
विशेष म्हणजे बुमराह रेड बॉल क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान 150 बळी घेणारा गोलंदाज ठरला.
शिवानीने चाहत्यांची इच्छा केली पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.