Anuradha Vipat
नव्या नवेली हिचं आजी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत नातं घट्ट आहे.
जया बच्चन नात नव्याला कायम महत्त्वाचे सल्ले देखील देत असतात.
आता ‘व्हाट द हेल नव्या’ या नव्याच्या पॉडकास्ट शोमध्ये जया बच्चन यांनी रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला आहे.
जया बच्चन म्हणाल्या, ‘गोष्ट माझ्या पिढीतील असो किंवा श्वेता हिच्या पिढीतील आम्ही या विषयावर विचार देखील करु शकत नव्हतो, पण नव्याच्या वयातली मुलं जेव्हा या अनुभवातून जातात तेव्हा कुठेतरी त्यांना आपण स्वतः अपराधी आहोत असं वाटतं. हे पाहून मला प्रचंड वाईट वाटतं
पुढे जया बच्चन म्हणाल्या, मला असं वाटतं आजच्या मुलांनी त्यांच्या खास मित्रासोबतच लग्न केलं पाहिजे. एकमेकांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.