109 किलो ते 83 किलो ; 'महाराज' सिनेमासाठी जयदीप यांचं कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन

सकाळ डिजिटल टीम

नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'महाराज' सिनेमा गाजतोय आणि या सिनेमात साकारलेली जदुनाथ महाराज ही भूमिकाही खूप गाजतेय.

या भूमिकेसाठी जयदीप यांनी स्वतःमध्ये कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन केलं.

ही भूमिका साकारण्यापूर्वी जयदीप यांचं वजन १०९ किलो होतं.

पण योग्य डाएट आणि व्यायामाच्या जोरावर जयदीप यांनी त्यांचं वजन ८३ किलोवर आणलं.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांची ही ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट सगळ्यांना सांगितली.

पोस्टमध्ये ते म्हणाले,"109.7 किलो ते 83 किलो फक्त पाच महिन्यांमध्ये. महाराज रोलसाठी केलेलं शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन."

सिनेमाच्या सेटवरही ते व्यायाम करत होते.

'महाराज' सिनेमाचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत असून जयदीप आणि जुनैद यांनी साकारलेल्या भूमिका गाजत आहेत.

येथे क्लिक करा