Swadesh Ghanekar
पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनेही सडतोड उत्तर दिले आहे.
इंग्लंडच्या स्टार फलंदाजाने कसोटीतील ३५ वे शतक झळकावताना पाकिस्तानच्या गोलंदाजाना हैराण केले आहे
जो रूटने ३ कॅलेंडर वर्षात कसोटीत ५ किंवा त्यापेक्षा जास्त शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याने २०२१ मध्ये ६,२०२२ मध्ये ५ आणि २०२४ मध्ये ५* शतकं झळकावली आहेत.
कसोटीत सर्वाधिक ५१ शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यानंतर जॅक कॅलिस (४५), रिकी पाँटिंग ( ४१), कुमार संगकारा ( ३८), राहुल द्रविड ( ३६) आणि जो रूट ( ३५) यांचा क्रम येतो.
कलेंडर वर्षात ५ किंवा त्यापेक्षा अधिक शतक सर्वाधिक ४ वेळा मॅथ्यू हेडन व रिकी पाँटिंग यांनी नोंदवली आहेत. जॅक कॅलिस, स्टीव्ही स्मिथ व जो रूट यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात ५००० धावांचा टप्पा त्याने ओलांडला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
जो रूट हा इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने ( १२४७३*) सर अॅलिस्टर कूकला ( १२४७२) मागे टाकले.
जो रूटने कसोटी क्रिकेटमद्ये ९९ वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याने राहुल द्रविडशी बरोबरी केली आहे.
कॅलेंडर वर्षात कसोटीत सर्वाधिक ६ वेळा सचिनने १००० हून अधिक धावा केल्या आहेत. जो रूटने पाचवेळा असा पराक्रम केला आहे.