हाताने रंगवलेल्या साडीत खुललं जुईचं सौंदर्य

सकाळ डिजिटल टीम

स्टार प्रवाह वरील 'ठरलं तर मग' या मालिकेमुळे अभिनेत्री जुई गडकरी चर्चेत आहे.

jui gadkari saree look

टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेल्या या मालिकेत जुई साकारत असलेल्या सायली या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे.

jui gadkari saree look

नुकतंच जुईने शेअर केलेल्या फोटोशूटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीमधील तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

jui gadkari saree look

जांभळ्या रंगाच्या या नऊवारी साडीवर हाताने रंगवलेलं राधा कृष्णाचं पेंटिंग दिसतं आहे. तर जांभळ्या साडीवर तिने घातलेला लाल रंगाचा ब्लाऊजही सुंदर दिसतोय.

jui gadkari saree look

जुईचा हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. शीतल हांडे यांच्या शर्वाणी या ब्रॅण्डची साडी आणि हा ब्लाउज जुईने घातला आहे.

jui gadkari saree look

तर तिचे हे फोटोज आदित्य वाघमारेने कॅप्चर केले आहेत.

jui gadkari saree look

अनेकांनी कमेंट करत जुईच्या सौंदर्याचं आणि लाघवी हास्याचं कौतुक केलं आहे.

jui gadkari saree look

जुईने नेसलेली ही साडी आणि तिच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

jui gadkari saree look
Ambani Wedding Cute Host
अंबानींच्या लग्नातील क्युट यजमान - येथे क्लिक करा