Anuradha Vipat
जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारलेली मेघना भुमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती
अशा या लोकप्रिय मालिकेला ११ वर्ष पूर्ण झाली आहे.
यानिमित्ताने प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ताच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ताने ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेली १३ वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करतेय. या वर्षांमध्ये टिव्ही जगतात अनेक प्रोजेक्ट्स केले.
प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पण ‘जुळून येती रेशीमगाठी’वर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे.