Anuradha Vipat
सोनालीने वैयक्तिक आयुष्यात बिजय आनंद यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे
सोनाली आणि तिच्या पतीमध्ये तब्बल २७ वर्षांचं अंतर आहे अशा चर्चा सर्वत्र चालू आहेत
यावर सोनालीने या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण देत टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
सोनाली म्हणाली, ही अफवा नेमकी कुठून सुरू झाली मला खरंच माहिती नाही,आमच्यामध्ये २७ वर्षांचं अंतर अजिबात नाही. माझा जन्म आहे ५ डिसेंबर १९७८ आणि माझ्या नवऱ्याचा जन्म १९७० सालचा आहे
सोनाली पुढे म्हणाली आमच्यात फक्त ८ वर्षांचं अंतर आहे. “८ वर्षांचं अंतर असण्यात कुठेही काही वावगं नाही
त्यामुळे मध्ये जे काही सगळीकडे येत होतं ते खोटं आहे आमच्यात फक्त आठ वर्षांचं अंतर आहे.” असं सोनाली खरेने स्पष्ट केलं आहे .