Anuradha Vipat
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. याच वर्षी दिशाने मुलीला जन्म दिला.
जन्मापासूनच ती सोशल मीडियावर तिच्या छोट्या परीसोबतचे फोटो शेअर करत असते.
अभिनेत्रीची लाडकी आता 2 महिन्यांची झाली आहे. दरम्यान, दिशाने तिचा फिटनेस प्रवास सुरू केला आहे.
दिशा परमारने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बूमरँग शेअर करून तिच्या फिटनेस प्रवासाच्या पहिल्या दिवसाची झलक दाखवली आहे.
या बूमरँग व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या फिटनेस कोचसोबत दिसत आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने लिहिले आहे- 'नॅटल वर्कआउटचा पहिला दिवस.
यापूर्वी दिशाने तिच्या मुलीसोबत खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. याशिवाय ती अनेकदा आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
मात्र, दिशाने अद्याप तिच्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. या अभिनेत्रीच्या लाडकीला पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.