सकाळ डिजिटल टीम
रॉस टेलरला मागे टाकत केन विल्यमसन न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा बनवणारा खेळाडू ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने ६३ धावांनी गमवला. पण या सामन्यातील पहिल्या डावात केन विलियम्सनने ५५ धावा केल्या, तर दुसरऱ्या डावात त्याला ३० धावांवरती समाधान मानावे लागले.
या सामन्यातील एकूण ८५ धावांसह विलियम्सनने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम रचला आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा बनवणारे टॉप-५ खेळाडू कोण आहेत हे जाणून घ्या.
केन विलियम्सनने ३५९ आंतरराष्ट्रीय सांमन्यांमध्ये एकूण १८२१३ धावा केल्या आहेत व यादीत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
रॉस टेलरने ४५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १८१९९ धावा केल्या आहेत व यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
३९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५२८९ धावा करणारे स्टीफन फ्लेमिंग यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
ब्रेन्डन मॅक्युलमने ४३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १४६६७ धावा केल्या आहेत व यादीत तो चौथ्या स्थानी आहे.
३६७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३४६३ धावा करणारा मार्टिन गुप्टिल यादीत पाचव्या स्थानी आहे.