Pranali Kodre
श्रीलंका दौऱ्यावर असलेला न्यूझीलंड संघ सध्या मोठ्या प्रमाणात संघर्ष करताना दिसत आहे. न्यूझीलंडच्या हाती या दौऱ्यात अद्याप मोठं यश आलेलं नाही.
पण अशात एक गोष्ट चांगली झाली आहे, ती म्हणजे केन विलियम्सने विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.
श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत ५१४ धावांची आघाडी घेत न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आहे. त्यानंतर न्यूझीलंडला लगेचच दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरावे लागले.
पण दुसऱ्या डावात न्यूझीलंडने तुलनेने चांगला खेळ केला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सने ५८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान विलियम्सनचे आता १०२ कसोटीमध्ये ५४.४८ च्या सरासरीने ८८८१ धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. तरी विलियम्सन कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे.
विराटच्या कसोटीत ११५ सामन्यांमध्ये ४८.७४ च्या सरासरीने ८८७१ धावा आहेत. विराट कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत २० व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, विराटला आता पुन्हा विलियम्सनला मागे टाकण्याची संधी आहे कारण अद्याप विराटला बांगलादेशविरुद्ध कानपूरला २७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या कसोटीत फलंदाजी करायची आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.