Anuradha Vipat
प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.
कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे
कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद खूप जुना आहे . कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर करण जोहरविषयी एक पोस्ट लिहिली आहे
पोस्टमध्ये कंगनाने पुढे लिहिले की, “एकच चित्रपट अनेकवेळा बनवल्याबद्दल करण जोहरला लाज वाटत नाही का?
तसेच कंगनाने करणला सल्ला देत म्हटल आहे की, कशावरही उगाच पैसे वाया घालवू नको, इंडस्ट्रीसाठी ही चांगली वेळ नाही. रिटायर हो आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवू देत
कंगना अनेकदा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला घराणेशाहीच्या वादावरून टार्गेट करते.