Anuradha Vipat
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत नेहमीच बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते
यामुळे अनेकदा कंगनाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूडमधल्या पार्ट्यांची पोलखोल केली आहे.
या पार्टीला उपस्थित राहणारे कलाकार हे प्रचंड स्वार्थी आणि गर्विष्ठ असल्याचं तिनं म्हटलं आहे
त्याचप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत माझे कोणीच मित्र-मैत्रिणी नाहीत असंही ति म्हणाली आहे
या मागचं कारण सांगत ति म्हणाली आहे की, ज्या लोकांना ब्रँडेड बॅग्स आणि आलिशान कार या विषयांव्यतिरिक्त काही बोलता येत नाही त्यांच्यासोबत मी मैत्री करू शकत नाही
तसेच पुढे “बॉलिवूड पार्ट्यांमध्ये होणाऱ्या गप्पा अत्यंत लज्जास्पद असतात असंही तिने म्हटलं आहे