Anuradha Vipat
कंगना तिच्या विविध वक्तव्यांसाठी कायमच ओळखली जाते.
आता उर्मिला मातोंडकरला एका मुलाखतीत कंगनाने सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं त्याची आठवण कंगनाला नेटकऱ्यांनी करुन दिली आहे.
आता कंगनाचं पुन्हा एक वक्तव्य समोर आलं आहे.
त्यात कंगनाने सनी लिओनीचं उदाहरण देऊन उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
सॉफ्ट पॉर्नस्टार या शब्दात आक्षेपार्ह काय आहे? यात काहीही आक्षेपार्ह नाही.हा शब्द समाजाने स्वीकारलेला नाही. असंही आता कंगना म्हणाली आहे
तसेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या देशात पॉर्नस्टारचा जितका आदर केला जातो तितका कुणाचाच आदर केला जात नाही. सनी लिओनीला जाऊन विचारा.” असं कंगनाने म्हटलं आहे.