Anuradha Vipat
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं वादग्रस्त विधानं केली आहेत. कंगना रणौत म्हणाली, “मी काहीही चुकीचं बोलले नव्हते. शरीराने स्वतंत्र्य होण्यालाच आपण स्वातंत्र्य मानतो का? तसे मानले तर आपण पारतंत्र्यात कधीच नव्हतो. असंही आता कंगना म्हणाली आहे
तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नव्हतं म्हणून पंतप्रधान केलं गेलं नाही, असाही दावा कंगना रणौतने यावेळी केला आहे.
स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्ता गेली, ते ब्रिटिशांचे पुढचे वारसदार होते, हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकते, असेही आव्हान कंगना रणौतने दिले आहे.
कंगना रणौत आपल्या बिनधास्त विधानांसाठी ओळखली जाते.
‘भारताला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले’, असे विधान काही काळापूर्वी कंगना रणौतने केले होते. त्या विधानावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते.