शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी कपालभाती प्राणायम आहे फायदेशीर

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे. 

Kapalbhati Benefits

निरोगी आरोग्य

संतुलित आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की, शरीराचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. 

Kapalbhati Benefits

योगासनांच्या नियमित सरावामुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Kapalbhati Benefits

कपालभाती प्राणायाम

योगासोबतच अनेक जण प्राणायम करण्यावर भर देतात. नियमित कपालभाती प्राणायाम केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच, शिवाय आपली पचनक्रिया देखील सुधारते. कपालभाती प्राणायाम करण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Kapalbhati Benefits

ताण-तणावापासून मिळतो आराम

कपालभातीचा दररोज सराव केल्याने ताण-तणावापासून आराम मिळण्यास मदत होते. त्यामुळे, जे लोक हे नैराश्याच्या समस्येने त्रस्त आहेत, त्यांनी नियमितपणे कपालभाती प्राणायम करणे फायद्याचे ठरते.

Kapalbhati Benefits

एकाग्रतेसाठी फायदेशीर

कपालभाती प्राणायमचा नियमितपणे सराव केल्याने तुमच्या मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. त्यामुळे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते. 

Kapalbhati Benefits

पचनक्षमता सुधारते

कपालभातीचा नियमितपणे सराव केल्याने पित्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासोबतच पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या देखील दूर होतात. 

Kapalbhati Benefits

कच्चे पनीर खाण्याचे भरपूर आहेत फायदे

Benefits of eating raw paneer | esakal
येथे क्लिक करा.