Anuradha Vipat
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
हे दोघं लग्न कधी करणार, याची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत आहेत.
मात्र चाहत्यांना सोशल मीडियावरील एक पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
रेडीट’ प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की तेजस्वी आणि करणने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे.
या पोस्टच्या मते तेजस्वी आणि करणच्या नात्यात गेल्या काही काळापासून तणाव पहायला मिळत आहे
करण आणि तेजस्वीकडून अद्याप त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
करण आणि तेजस्वीच्या ब्रेकअपबद्दलची पोस्ट वाचून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.