Anuradha Vipat
करीनाने नुकताच ओटीटीवर पदार्पण केले आहे. तिचा 'जाने जा' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा आहे.
या चित्रपटासाठी करीनाने सर्वाधिक मानधन घेतले आहे . ती ओटीटीसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
करीनाने यापूर्वी लाल सिंह चड्ढा या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिने जवळपास ८ कोटी रुपये मानधन घेतले.
त्यानंतर ओटीटी डेब्यूसाठी करीनाने १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतले आहे
जाने जा हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर आहे. या चित्रपटात सिंगल मदर असलेल्या आई आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे
या चित्रपटासाठी करीनाने घेतलेल्या मानधानमुळे सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत